Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

marathinews24.com

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे.

राज्य महिला आयोग आणि यशदामार्फत आयोजित – सविस्तर बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विचारधारा अधिक बळकट करण्यामध्ये पवार हे मोलाचे योगदान देत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.’ अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘एक्स’ या समाज माध्यमावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कामांना गती आणि बळकटी देण्यामध्ये आपली भूमिका कौतुकास्पद आहे. तुमच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”असे शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, “आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा हा स्नेह माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत मी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.”

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून, सोशल मीडियावर त्यांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या पोस्ट्सचा पूर आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×