Breking News
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार‘डिजिटल’ अटकेची दाखवली भीती, पुण्यात ज्येष्ठाची ६ कोटींची केली फसवणूककोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचे दागिने चोरीलापीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची पाटली चोरीलाप्रवासात बेदम मारहाण करीत तरूणाला लुटलेमहिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरीऑनलाईन टास्कचे आमिष पडले १२ लाखांवरछळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हाकार्यकर्ता कधीच निवृत्त होत नाही-पद्मश्री गिरीश प्रभुणेअवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्या

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मसाज पार्लरच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नागालँड, पश्चिम बंगाल, राजस्थानसह तरुणींसह पाचजणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मसाज पार्लरच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज भागातील गावठी दारू अड्ड्यावर जेसीबी चालवला – सविस्तर बातमी

मसाज पार्लरचा मालक कफील उद्दीन (वय ३०, रा. जमनामुख, आसाम) याच्यासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खराडीतील इमारतीत असलेल्या ‘सेलेस्टीया द वेलनेस स्पा’ येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले. मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माेनाली भदे, नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अमोल भिसे, महेश नाणेकर, वैशाली खेडेकर, पूजा डाहाळे, कोमल वाकचौरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top