Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Election News : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेचा आढावा

Pune Teachers Graduates Election 2026

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाबाबत पोलिसांना सूचना

marathinews24.com

पुणे – Pune Election News : पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडासंकुलात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम – सविस्तर बातमी 

या पाहणीवेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, परिमंडळ-२ मधील पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. (Pune Election News) यावेळी स्ट्राँगरूमच्या परिसराची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

स्ट्राँगरूमच्या ठिकाणी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने स्ट्राँगरूम आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×