Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

‘कलारंग’ गानमैफलीला पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद!

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन चा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – भारतीय विद्या भवन, पुणे केंद्र आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ज्येष्ठ गायिका शुभदा देशपांडे यांच्या ‘कलारंग’ या सांगीतिक मैफलीला पुणेकर रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवार,दि.१९ जुलैला भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात संध्याकाळी ६ वाजता झालेल्या मैफलीने उपस्थित रसिकांना अविस्मरणीय संगीत अनुभव दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी – सविस्तर बातमी

‘कलारंग’ गानमैफलीला पुणेकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद!

शुभदा देशपांडे यांनी राग नंद गाऊन मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पं. गिरिजादेवी यांचा ‘दिवाना किया शाम’ हा दादरा आणि पारंपरिक होरी अत्यंत भावपूर्ण सादर केली. ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा’ यासारखी गीते,नाट्यगीते प्रभावीपणे सादर केली. ‘पंढरीचा वास’, ‘निसीदिन बरसत नैन हमारे’, ‘इतना तो करना स्वामी’, ‘नाही पुण्याची मोजणी’ अशी विविध भजने सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी संकीर्तनाने केला. गायनाला संवादिनीवर माधव लिमये, तबल्यावर सौरभ गुळवणी आणि तालवाद्य वादनावर विनायक दीक्षित व ओंकार जोशी यांनी सुरेख साथ दिली. गायन आणि वाद्यसंगत यांचा सुरेल मिलाफ रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठसणारा ठरला.

‘कलारंग’ हा भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील २५३ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.या संगीतमय सायंकाळी पुण्यातील रसिकांना एकसंध आनंदाची अनुभूती दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील हा कार्यक्रम एक अविस्मरणीय गानमैफल ठरली.मनीषा जोशी यांनी प्रास्ताविक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×