Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पुण्यात पिस्तूलांचा बाजार मांडणार्‍या सराईताला बेड्या

पुण्यात पिस्तूलांचा बाजार मांडणार्‍या सराईताला बेड्या

५ पिस्तूल, ७ काडतुसे जप्त

marathinews24.com

पुणे – पिस्तूलांचा बाजार मांडणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने लातूरातून अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ५ गावठी पिस्तूल, ७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तो आर्म अ‍ॅक्टमधील पाहिजे आरोपी असून, मागील काही दिवसांपासून पसार झाला होता. शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद (वय २० रा. अप्पर इंदीनानगर बिबवेवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

प्रभात रस्त्यावरुन संगीत शिक्षकाची दुचाकी चोरली – सविस्तर बातमी 

पर्वती, खडक, वाघोली पोलीस ठाण्यातंर्गत आर्मअ‍ॅक्ट नुसार गुन्हे दाखल असलेला सराईत शेख अहमद हा पसार होता. तो लातुरमध्ये असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक दोनला मिळाली. पथकाने लातूरला जाउन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ पिस्टूल, काडतुसे असा दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक राम राजमाने, सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, पवन भोसले, आझाद पाटील, चेतन आपटे, प्रशांत शिंदे, विनोद महाजन, संजय आढारी, अनिल कुसाळकर,अमोल राऊत यांनी केली.

सोशल मीडियाद्वारे खरेदी-विक्रीचा व्यवहार

आरोपी शेख अहमद हा गावठी पिस्टलचे फोटो काढून सोशल मिडीयावर प्रसारित करीत होता. त्यानंतर पिस्टल व काडतुसांची खरेदीविक्री करण्यासाठी इस्टाग्रामद्वारे संपर्क साधत होता. तो मध्यप्रदेश येथील उमरठी गावातील अग्निशस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात आहे. ओळखीचे लोकांना तेथे पाठवुन मध्यस्थी करुन गावठी पिस्टल खरेदी करत असलेबाबत निष्पन्न झाले आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×