Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

वाढत्या गुन्हेगारीने पुणे पोलिसही हतबल

दरोड्यापुर्वीच पुणे पोलिसांनी तीन टोळ्यांचा डाव उधळला

बिष्णोई गँगपासून घायवळ टोळीपर्यंत गुन्हेगारांचे आव्हान

marathinews24.com

पुणे – शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह सराईत टोळ्यांमध्ये पोलिसांच्या कामाचा दरार, दहशत क्रमप्राप्त आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यास मदत होते. प्रत्यक्षात मात्र, आंतरराष्ट्रीय गँगस्टर आणि नामचिन गुंड टोळ्यांनी नागरिकांवरील दहशतीच्या साम्राज्यावर पुणे पोलिसांपुढेही आव्हान निर्माण केले आहे. बिष्णोई गँग ते घायवळ टोळीने पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, याबाबत अजूनही पोलिसांनी खबरदारी न घेतल्यामुळे टोळ्यांचे फावले आहे. बिष्णोई टोळीकडून खंडणीच्या नावाखाली व्यापार्‍यावरील गोळीबार आणि घायवळ टोळीतील नंबरकारीकडून व्यावसायिकावर केलेला कोयता हल्ला पोलिसांची गाफिलता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार – सविस्तर बातमी

वाढत्या औद्योगिकरणामुळे पुण्यातील व्यावसायिकांची भरभरात झाली असून, कोट्यावधींचे व्यवहार थेट आंतरराष्ट्रीय गँगस्टर टोळीच्या नजरेत येउ लागल्याचे चित्र आहे. अशा गॅगस्टरांसह टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीस दलात कार्यरत असलेली खंडणी विरोधी पथकेही आता ढेपाळली आहेत. त्यामुळे गुंड टोळ्यांचे फावले असून, रेकॉर्डवरील टोळ्यांसह अगणित छोट्या मोठ्या भाईंकडून हद्दीतील व्यापार्‍यांना धमकावले जात आहे. सध्यस्थितीत पोलिसांची पथकेच अ‍ॅक्टिव्ह नसल्यामुळे एकही तक्रारदार खंडणी विरोधी पथकांकडे येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जावे तर कोठे जावे, कोणाला आपली तक्रार मांडावी अशी स्थिती व्यापार्‍यांमध्ये आहे.

फुरसुंगीतील स्टील व्यापार्‍याच्या गोदामावर गॅगस्टर बिष्णोई टोळीने गोळीबार केल्याची घटना नुकतची घडली आहे. लाखो रूपयाच्या खंडणीसाठी आंतरराष्ट्रीय टोळी शहराच्या वेशीवर येउन आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाचे वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. दरम्यान, विविध प्रकरणात फरार असलेला पुण्यातील आरोपी शुभम लोणकर यानेही पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. त्याच्या अटकेसाठी लुकआऊट सर्क्युलर जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

कोथरूड परिसरात मोबाइल शॉपी व्यावसायिकावर ८ ते १० जणांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.१४ जुलैला संध्याकाळी सातच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून संबंधितावर वार केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, यातील आरोपी प्रशांत धुमाळ हा कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा नंबरकारी (जुन्या गुन्ह्यातील सहआरोपी ) आहे. त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनेत अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, व्यावसायिक अमित शिंदे यांच्या मोबाइल शॉपीतून बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड मिळवले होते. ते सीमकार्ड गुंड नीलेश घायवळ वापरत होता. याप्रकरणी शिंदे यांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

खमकी अन नेमकी भूमिका गरजेची

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची खमकी अन नेमकी भूमिका गरजेची आहे. एकीकडे घरफोडी, वाहन तोडफोड, ज्वेलर्स दरोडा, मोबाइलसह चैनस्नॅचिंगचा आलेख उंचावत आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय गँगस्टर बिष्णोई ते कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीचा दबदबा काही केल्या कमी होत नसल्याचे विविध घटनांवरून दिसून आले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, गुन्हेगारी कमी करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांनी आहे.

कुठे आहे गुन्हे शाखा, समन्वयाचा अभाव

कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या टोळीने राडा घालून तो पसार झाला. बिष्णोई टोळीने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. यासह शहरातील अनेक गंभीर घटना, गुन्ह्यांमुळे नागरिकांमधील धास्ती वाढली आहे. त्यातच स्थानिक पोलिसांच्या अपयशानंतर गुन्हे शाखेलाही आरोपींचा माग काढण्यात अपयश येत आहे. अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव, प्लॅनिंग नसणे, पथकांचा ताळमेळ न घातल्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट आहेत. गुन्हे शाखेचा कामाचा आलेख घसरला असून, कुठे आहे गुन्हे शाखा असे विचारण्याची वेळ आता मोकाट आरोपींमुळे आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×