१ कोटी ७५ लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट
marathinews24.com
पुणे – नशामुक्त पुणे शहर करण्याच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथकांनी ड्रग्ज तस्करांविरूद्ध वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानुसार जप्त केलेल्या तब्बल १ कोटी ७५ लाख रूपयांच्या ड्रग्जचा रांजणगावमधील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये नाश करण्यात आला आहे. दरम्यान, आगामी काळातही ड्रग्ज पेडलविरूद्ध कारवाईची मोहिम सुरूच ठेवत, नशामुक्त शहर बनविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी
शहरातील विविध भागातून जप्त केलेल्या १ कोटी ७५ लाख रूपये किंमतीच्या २८४ किलो अमली पदार्थांचा नाश करण्यात आला. ड्रग्ज जप्तीत सर्वाधिक गांजाचा समावेश असून, सर्व अमली पदार्थांचा नाश करण्यासाठी पोलिसांनी नियमावलींची पुर्तता केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कमिट्यांचे सचिव, सदस्य, मोजमाप कमिटीसमक्ष अमली पदार्थांचा रांजणगाव एमआयडीसीत नाश केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्जचा रांजणगाव एमआयडीमध्ये नाश करण्यात आला.
ड्रग्ज फ्री पुणे शहर करण्याच्या दृष्टीकोनातून पेडलविरूद्ध पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जाते. फेबु्रवाारी २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करीत मेफेड्रोन विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त केले होते. त्यामध्ये तब्बल ३ हजार ७०० कोटींवर किंमतीचे १ हजार ८०० किलो एमडी जप्त केले. ड्रग्ज पेडलरपासून निर्मिती करणार्यांवर वॉच ठेउन कारवाई केली जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय अनिल सुरवसे, एपीआय नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, राजेंद्र पालांडे, मोहन पालवे, संजय राजे, मारती पारधी, दत्ताराम जाधव, नितीन जाधव, नागेश राख, दयानंद तेलंगे, संदीप शिर्वेâ, सुहास डोंगरे, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, रेहाना शेख, चेतन गायकवाड, अक्षय शिर्वेâ, दीनेश बोस्टवाड, सुहास तांबेकर यांच्या टीमने ड्रग्जची होळी करण्यासाठी मेहनत घेतली.
पावणेदोन कोटींचे २८४ किलो ड्रग्ज नष्ट
गांजा-२१७ किलो ७८८ ग्रॅम- ४३ लाख ५५ हजार
एमडी-११८ ग्रॅम- २३ लाख ६५ हजार
कोकेन-१२० ग्रॅम- २४ लाख १८ हजार
चरस -५३९ ग्रॅम- ५४ लाख ४६ हजार
मेथाम्फेटामाईन-७८ ग्रॅम- १५ लाख ६० हजार
अफुची झाडे-५९- ५ लाख ९७ हजार
गांजामिश्रीत बंटागोळी- ५१२ ग्रॅम ५ लाख १२ हजार
ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई करीत त्यांची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात. दरम्यान, जप्त केलेल्या ड्रग्जचा नाश रांजणगाव एमआयडीच्या भट्टीत केला आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा





















