Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Police Extortion Case : पुण्यात खंडणी बहाद्दरांना दिले जातेय अभय

Pune Police

ना अटक ना चौकशी

marathinews24.com

पुणे – Pune Police Extortion Case : नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पुणे पोलीस दलातील काही पोलीस अमलदारांमुळे खात्याला बट्टा लागला आहे. वर्दीच्या आडून सर्वसामान्यांना वेठीस धरून थेट खंडणी मागितली जात आहे. त्यामुळे अशा खंडणी बहाद्दरांमुळे चांगले काम करणार्‍या अमलदारांसह अधिकार्‍याच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. त्यातच संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात रिलस्टार महिला पोलीस अमलदाराविरुद्ध काय कारवाई केली, हे गौडबंगाल गुलदस्त्यात आहे.

स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ.डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करणे, नागरिकांमध्ये विश्वास संपादित करुन त्यांना सुरक्षिततेची हमी देणे, प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तपास करुन आरोपींविरुद्ध कारवाई करणे, अवैध धंदेवाल्यांfवरुद्ध कारवाईचा बडगा उगारणे अशा प्रकारे बेसिक पोलिसिंग करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र, तक्रारदाराला दिलासा देण्याऐवजी त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देउन खंडणी उळकण्यात अनेकांचा हातखंडा झाला आहे. (Pune Police Extortion Case) बहुतांश प्रकरणात पोलिसांकडून तक्रारदारांचे काम होण्यासाठी अवाजवी मागणी केली जाते. त्यावर भागले नाही तर अमुक-तमुक करण्याच्या धमकीने वेठीस धरले जाते. एकीकडे झालेला अन्याय तर दुसरीकडे पोलिसांकडून दिला जाणारा मनस्ताप सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा ठरतो. त्यामुळे तडजोड केल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. त्यामुळे नियमातील कामालाही चक्क खंडणी द्यावी लागत असल्याची अनेक प्रकरणे आहेत.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापासून सुरू झालेला प्रवास काही पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या खंडणीच्या पुर्ततेनंतरच पुर्ण होत आहे. शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांची तक्रार, एनसी दाखल होण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील अमलदारांनी उकळलेल्या खंडणीच्या सर्वश्रुत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात तत्काळ कारवाई करुन संबंधिताना धडा शिकवणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई करतानाही दुजाभावपणा केला जात असल्याचे काही घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. खंडणीसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक न करणे, त्यांना जामीन मिळेपर्यंत संधी देणे, वरिष्ठांना चुकीचे रिपोर्टिंग करणे घडत आहे.

किराणा माल दुकानात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचार्‍याने साथीदाराच्या मदतीने १ लाख ६५ हजार रुपये घेतले. पोलीस कर्मचारी रामकिसन हंबर्डे, सतीश मोरे (रा. वडकी, हडपसर सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हंबर्डे याला निलंबित केले आहे. दुसर्‍या घटनेत कुटूंबियासमवेत प्रवास करणार्‍या तरूणाच्या गाडीतून अमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करीत महामार्ग पोलिसांसह वॉर्डनने त्यांच्याकडून तब्बल ५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. ही घटना ५ जुलैला पुणे-मुंबई महामार्गावरील ताजे गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी महामार्ग वाहतूक पोलिसांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलीस नाईक अमोल वायकर, शिपाई अमोल नन्नावरे, शिपाई तुषार धावरे, वॉर्डन किसान बोंम्बले, नितेश चव्हाण, तुषार घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रिलस्टार खंडणीखोर महिला अमलदार गायब

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या फौजदाराने एका रिलस्टार महिला दामिनीसह अमलदाराच्या मदतीने महाविद्यालयीन प्राचार्याला गोत्यात आणले. त्यांनी विद्यार्थीनीला ट्रॅपमध्ये सहभागी करून घेत तिला प्राचार्यांविरूद्ध तक्रार करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्रिकुटाने प्राचार्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देउन ७ लाखांची खंडणी उकळली आहे. प्राचार्याला पोक्सोच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे यांनी खंडणी उकळली आहे. त्यांच्याविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी महिला अमलदार अजूनही गायब असून, तिच्यावर नेमकी काय कारवाई झाली, हे मात्र, गुलदस्त्यात आहे.

डॉक्टरासह पोलीस निरीक्षकाकडे खंडणीची मागणी, पत्रकारांविरुद्ध गुन्हा

खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलींचे बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचा आरोप करुन डॉक्टरांकडे तोतया पत्रकारांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी तोतया पत्रकारांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रणव उर्फ प्रसाद बोरसे (वय २५), शुभम सौदागर (वय २६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दुसर्‍या गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांच्या राखीव पोलिस निरीक्षकाकडे यु ट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमच्याविरोधात बातमी प्रसिद्ध करून नोकरी घालवतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुझम्मील शेख ( वय २९, रा. कोंढवा ) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक भगवान टोणे (वय ५७) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×