Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश

पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश

मुलींना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण भोवली

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून सासरहून निघून आलेल्या महिलेला घरात आसरा देणार्‍या मुलींना कोथरूड पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ करी मारहाण केली होती. याप्रकरणी आता न्यायालयाने दखल घेतली असून, जातीभेद करणार्‍या संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोथरूड परिसरात ३ मुलींवर झालेल्या मारहाण आणि जातीवाचक प्रकरणाने पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जांभुळवाडीतील तलावात बुडून शाळकरी मुलगा ठार – सविस्तर बातमी 

कोथरूड पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्यानंतर पीडित मुलींनी न्यायासाठी पोलीस आयुक्तालयात धरणे देत आवाज उठवला होता. संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी याचिका अ‍ॅड. अरविंद तायडे यांनी न्यायालयात दाखल केली होती. अखेर न्यायालयाने याची दखल घेत संबंधित आदेश दिले आहेत. पतीकडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून छत्रपती संभाजीनगरमधील २३ वर्षीय विवाहित महिलेने पुण्यातील मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला होता. संबंधित महिलेला आधार देणार्‍या तीन मुलींना कोथरूड पोलिसांनी चुकीची वागणूक दिली. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना थेट ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान जातीय शिवीगाळ, शाब्दिक अपमान, मारहाण केली असा आरोप मुलींनी केला होता. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी पीडित मुलींसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत आता न्यायालयाने संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा बॅक फुटवर गेले आहेत.

यांच्यावर होणार गुन्हा दाखल

कोथरूड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अमोल कामटे, महिला अमलदार संजीवनी शिंदे, हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप, माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे केला जावा, यासाठी संपूर्ण चौकशी सहायक पोलीस आयुक्तांकडे वर्ग करण्याचेही आदेश दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×