Breking News
तब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजननाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा…दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खून

पुणे हादरले, तोंडावर स्प्रे मारून संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार

Pune shaken, young computer engineer raped by spraying her face

मी पुन्हा येईल असे म्हणत काढला सेल्फी – कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची आरोपीची बतावणी

marathinews24.com

पुणे – उच्चभ्रु सोसायटीतील फ्लॅटमध्ये शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करुन आरोपी घरात शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा मागा काढण्यात येत आहे. याबाबत २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारकर्‍यांना लुटणार्‍या संशयित आरोपीचे स्केच जारी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भाऊ राहायला आहेत. तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी (२ जुलै) सायंकाळी तरुणी एकटीच फ्लॅटमध्ये होती. त्यावेळी आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने घराचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बातवणी केली. तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिची डोळे जळजळले. त्यानंतर आरोपी तरुण घरात शिरला.

तरुणीला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा संदेश मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. तरुणीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. शाेध घेण्यात येत आहे. त्या आधारे पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top