Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुणे – दुचाकी चोरट्यांना अटक, दोन गुन्हे उघडकीस

गुुन्हे शाखेच्या युनीट सहाने केली अटक

marathinews24.com

पुणे – दुचाकी चोरट्यांना अटक, दोन गुन्हे उघडकीस – दुचाकींची चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना गुुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून वाहन जप्ती केली आहे. दीपक राजेंद्र बीडगर (वय २३ रा. न्हावरा, शिरूर) आणि मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१ रा. रांजणगाव, पुणे ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी चोरट्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

झटपट श्रीमंत होण्याचे आमिष पडले १५ लाखांना – सविस्तर बातमी

वाहनचोरी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी युनीट सहाचे पथक एपीआय राकेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार सचिन पवार यांना पेरणे फाटा परिसरात एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दीपक बीडगर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिक्रापूर परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

युनीट सहाचे पथक वाघोली परिसरात पेट्रोलिंग करीत असताना भावडी रोड परिसरात आरोपी मच्छिंद्र खैरनार हा संशयास्पद फिरताना पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने म्हाळुंगे परिसरातून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीसी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, एपीआय राकेश कदम, एपीआय मदन कांबळे, बाळासाहेब सकट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×