Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

marathinews24.com

बारामती – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालयात ‘मेडियल पिव्होट’ (Medial Pivot) गुडघ्याचे इम्प्लांट (सांधे) वापरून शहरातील पहिली रोबोटिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. बारामती येथील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात ही शस्त्रक्रिया गरजू रुग्णांकरिता दिलासा देणारी बाब आहे.

क्लस्टर पद्धतीने फळपिकांचे लागवडक्षेत्र वाढावे यासाठी मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी – सविस्तर बातमी 

बदलत्या काळात तालुक्यातील रुग्णांना अत्याधूनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन उपचार मिळाले पाहिजे, याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा सतत पाठपुरावा असतो. प्रयोगशील, प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या बारामती शहरात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासक, क्रांतीकारी पाऊल आहे. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक पद्धती स्वीकारण्यासोबतच येथील रुग्णांना उच्चतम-गुणवत्तेच्या वैद्यकीय सोई-सुविधा अधिक सुलभतेने मिळण्यासाठी पर्याय असल्याचे दर्शवून देते.

डॉ. गिरीश भालेराव, ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील शासकीय रुग्णालयातील कुशल सर्जिकल पथकाने ही कठीण, जटील अग्रगण्य शस्त्रक्रिया केली. रोबोटिक तंत्रज्ञानाची बिनचूक कार्यप्रणाली वापरून डॉक्टर्सनी बॉयराड मेडीसीस (Biorad Medisys) या कंपनीचा मेडियल पिव्होट ( Medial Pivot) गुडघा प्रत्यारोपित केला. जो गुडघ्याच्या नैसर्गिक हालचालीची नक्कल करून सांधरोपण शस्त्रक्रिया अतिशय सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेला इम्प्लांट आहे.

शस्त्रक्रियेमध्ये वापरला जाणारा मेडिअल पायवोट हा गुडघ्याचा कृत्रिम सांधा शस्त्रक्रियेनंतर अधिक नैसर्गिक आणि सहज कार्य करण्यासाठी रचना केलेला आहे. त्याची रचना संपूर्ण हालचालीच्या श्रेणीमध्ये गुडघ्याच्या आतील बाजूस एक स्थिर पिव्होट पॉइंट प्रदान करते, ज्यामुळे निरोगी गुडघा नैसर्गिकरित्या हालचाल करतो त्या पद्धतीने बारकाईने प्रतिकृती बनवते. रोबोटिक सहाय्य सर्जनना रिअल-टाइम डेटा आणि इम्प्लांट प्लेसमेंटवर अचूक नियंत्रण प्रदान करून इम्प्लांटची अचूकता आणि टिकाऊपणा आणखी वाढवते. ज्यामुळे वैयक्तिक रुग्णाच्या शरीर रचनेनानुसार सदर इंप्लांट अचूक कार्यरत होते. डॉ. गिरीश भालेराव, ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन: ‘बारामतीमधील रुग्णांना पहिल्यांदाच हे प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान आणि मेडिअल पिव्होट गुडघा असे लाभ देऊ करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या बाबींची जोड दिल्यामुळे आम्हाला उच्च पातळीची अचूकता प्राप्त करता येते आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार गुडघा इंप्लांट तयार करता येते.’

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×