Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बोपदेव घाटातील लॉजवर छापा; बांगलादेशी तरुणी ताब्यात

लाॅज व्यवस्थापकासह दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – बांगलादेशी तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोपदेव घाट परिसरातील एका लाॅजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

घरकाम करणाऱ्या महिलांकडून २० लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

याप्रकरणी लॅाजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (वय ४६, रा. येवलेवाडी, कोंढवा), कामगार सचिन प्रकाश काळे (वय ४०) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांचे पथक गस्त घालत होते. बोपदेव घाट परिसरातील एका लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींना देहविक्रीय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर लाॅजवर छापा टाकण्यात आला. तेथे दोन बांगलादेशी तरुणी आढळून आल्या. चौकशीत लॉजचा व्यवस्थापक रवी गौडा याने दलालामार्फत या तरुणीना आणल्याची माहिती मिळाली. तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याची माहिती तपासात मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

परिमंडळ पाचच्या प्रभारी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे, अरुण कीटे, सुषमा हिंगमिरे, सोनाली कांबळे, राहुल रासगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना भारतात आणण्यात येते. त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले जाते. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे (ह्युमन ट्रॅफिकिंग) जाळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींना बांगलदेशातील दलालांनी किरकोळ पैसे देऊन भारतात आणले. त्यादृष्टीने कोंढवा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत छापा टाकून पोलिसांनी बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते.

पुण्यातील न्यायालयाने बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी दोन बांगलादेशी तरुणींना नुकतीच दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तरुणींची बांगलादेशात रवानगी करण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×