Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

हिंजवडी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा

नियोजित कामांसाठी उशीर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होणार

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही सुरू झाली असून परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

लम्पी चर्म रोग प्रतिबंध उपाय योजना प्रभावीपणे राबवाव्यात -जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी – सविस्तर बातमी

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरिक संघटनांच्या प्रतिनिधिंशी याबाबत आज संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रतिनिधिंनी तातडीने सुरू झालेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी ही कार्यवाही सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी दिल्या.

काही यंत्रणांकडून कामांमध्ये दुर्लक्ष होऊन रस्त्याच्या दुरूस्तीची कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. हिंजवडी परिसरातील नागरिक संघाच्या प्रतिनिधिंसोबत एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व यंत्रणांचे प्रतिनिधीदेखील असतील. या प्लॅटफॉर्मवर त्यांना सर्व प्रश्न उपस्थित करता येतील आणि ते प्रश्न तातडीने सोडवले जातील, असेही निश्चित करण्यात आले आहे.

000

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×