Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा

जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुणे ग्रामीण), सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व तडीपार प्रकरणांचा गुणवत्तेवर निपटारा करणे, दारूबंदी आदेश निर्गत करणे, शवबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करणे यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्यात आले.

ईव्हीएम व्यवस्थापनासंदर्भात पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच ईव्हीएम स्ट्राँग रूमला पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय ईव्हीएमची योग्य हाताळणी, सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक माहिती भरणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, मतदान वाढीसाठी मतदार जागृती अभियान राबवणे आणि सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत निवडणुकीसंबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे काटेकोरपणे पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×