Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाअंतर्गत ५० टक्के मृत्यू कमी करण्यावर भर

marathinews24.com

पुणे – रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित रस्ते वापराची संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने ३७ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण’ कार्यक्रम पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. सन २०३० पर्यंत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाअंतर्गत ५० टक्के मृत्यू कमी करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आयोजित उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन – सविस्तर बातमी

यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखचे उप आयुक्त हिम्मत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, इतर अधिकारी तसेच महामार्ग प्रकल्पांशी संबंधित कंत्राटदार, अभियंते, सुरक्षा अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वेग मर्यादांचे पालन करणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची जबाबदारी स्वीकारणे याबाबत संकल्प केला. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत वैयक्तिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत सुरक्षित वाहतुकीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचविण्यात मदत होईल असे नमूद करुन सुरक्षित वाहतूक करणेबाबत जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्याच प्रमाणे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात रस्ता सुरक्षा व सुरक्षा लेखापरीक्षण, रस्त्यालगतच्या धोक्यांचे व्यवस्थापन, वाहन अपघात प्रतिबंधक संरचना तसेच ‘रोडसाईड फर्निचर’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था, सेफ्टी फर्स्ट, नवी दिल्ली, 3एम इंडिया लिमिटेड येथील तज्ज्ञांनी सादरीकरणाद्वारे उदाहरणांसह माहिती दिली. “गोल्डन अवर्स इन रोड सेफ्टी” सत्रात ज्यामध्ये अपघातानंतरचे तातडीचे बचावकार्य, प्रथमोपचार व अग्निशमनाबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. अपघातानंतरच्या पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व यावेळी प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उप मुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×