Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीर

सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीर

अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि समुदाय व समाज सेवा या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील संस्थांमधून पुरस्कारविजेत्यांची केली जाते निवड

marathinews24.com

पुणे – २९ व्या महावीर पुरस्कारासाठी देशभरातून आलेल्या २६७नामांकन अर्जाचे मान्यवरांच्या परीक्षण मंडळाद्वारे काळजीपूर्वक मूल्यमापन करण्यात आले. भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एम. एन. वेंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा ही जवाबदारी पार पाडली. ज्येष्ठ संन्यासिनी आचार्य चंदनाजी महाराज, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.  डी. वाय. चंद्रचूड, भारतीय रिझर्व बँकेचे अंशकालीन संचालक तसेच तुघलकाचे संपादक  एस. गुरुमूर्ती, भारतीय विद्या भवन मंगलगुरू केंद्राचे चेअरमन प्राध्यापक बी. एम. हेगडे, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, निवृत्त आयएएस अधिकारी तसेच सेवीचे माजी अध्यक्ष श्री. डी. आर. मेहता, भारत सरकारचे माजी कॅबिनेट सचिव प्रभात कुमार (निवृत्त आयएएस अधिकारी) आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती  जी. एस. सिंघवी यांचा परीक्षण मंडळावर समावेश होता.

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी – सविस्तर बातमी 

उत्कृष्ट मानवतावादी सेवेची दखल घेण्याच्या उद्देशाने भगवान महावीर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा २९वा राष्ट्रीय महावीर पुरस्कार सरहद या पुणेस्थित सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. अहिंसा व मानवीय कार्याच्या समर्थनासाठी तसेच शिक्षण, सांस्कृतिक संवाद व जनसंवाद यांच्या माध्यमातून मानवतावादी मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल महावीर पुरस्कार २०२६ द्वारे घेण्यात आली आहे. अहिंसा , शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि समुदाय व समाज सेवा या क्षेत्रांमधील कामगिरीसाठी दरवर्षी महावीर पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक महावीर पुरस्कार विजेत्याला १० लाख रुपये रोख आणि त्यासोबत स्तुतीपर मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री. संजय नहार यांनी १९९५ मध्ये स्थापन केलेली सरहद पंजाब, जम्मू-काश्मीर व ईशान्य भारत आदी भारतातील संघर्षप्रवण भागांमध्ये शांतता राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आहे. शांतताफेन्या, दोन धर्मामधील संवाद, सांस्कृतिक उत्सव, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी आदानप्रदान उपक्रम यांच्याद्वारे ‘सरहद’ने विविध समुदायांमध्ये सौहार्द, विश्वास व परस्पर सामंजस्य जोपासले आहे. त्याचबरोबर संघर्षप्रवण प्रदेशांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक व निवासी सहाय्यही संस्थेतर्फे पुरवले जाते. सरहद संस्थेसोबतच पुढील संस्थांना २९व्या महावीर पुरस्काराने गौरवण्यात आलेः कॉर्ड, हिमाचल प्रदेश, शिक्षण; श्री शंकरा कॅन्सर फाउंडेशन, कर्नाटक, वैद्यकशास्त्र, आणि संगखुमी बुआलघुआक, मिझोराम व निर्माण, ओडिशा, समुदाय व सामाजिक सेवा.

पुरस्काराच्या चार प्रवर्गामध्ये निस्वार्थ सेवा करणाऱ्यांकडून फाउंडेशनने ३० व्या महावीर पुरस्कारांसाठीही अर्ज मागवले आहेत. नामांकन अर्ज फाउंडेशनच्या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतील: www.bmfawards.org.

भगवान महावीर फाउंडेशनचे संस्थापक श्री. सुगलचंद जैन यावेळी म्हणाले, “सरहद संस्थेने अहिंसा व मानवतावादी मूल्यांचे चैतन्य कृतीत उतरवण्याचे उदाहरण घालून देण्याजोगे कार्य केले आहे. संवाद, शिक्षण व नीतीमत्तापूर्ण सहभाग समाज परिवर्तनात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे ‘सरदह’च्या कामातून दिसून येते. शांतता व सौहार्दाचा प्रसार करण्यासाठी ‘सरहद’ने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली मान्यता ‘सरहद’चे उद्दिष्ट आणखी दृढ करण्यात तसेच अन्य अनेकांना प्रेरणा देण्यात उपयुक्त ठरेल, अशी आशा आम्हाला वाटते.”

२०२६ सालासाठी प्रदान केल्या गेलेल्या पुरस्कारांनंतर महावीर पुरस्कार प्राप्त करणायांची संख्या २०१ झाली आहे. हे २०१ पुरस्कारविजेते २६ राज्ये व २ केंद्रशासीत प्रदेशांतील आहेत. २९व्या पुरस्कारांपूर्वी महावीर पुरस्कार प्राप्त करणायांची संख्या १६ होती. गेल्या अनेक वर्षांपासून महावीर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जात आहेत. यांमध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे. औपचारिक सोहळ्यांमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×