Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

स्वारगेट परिसरात ज्येष्ठ नागरिकाला पाईपने मारहाण

स्वारगेट परिसरात ज्येष्ठ नागरिकाला पाईपने मारहाण

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकाला वादातून पाईपने मारहाण केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद गव्हाणे (वय २०, रा. दत्त मंदिराशेजारी, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाषाण भागात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक २६ जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरी होते. त्या वेळी आरोपी तेथे आला. ‘तुमच्या नातवाला दोन मोबाइल संच दिले होते. त्याची विक्री केली का ? ’, अशी विचारणा आरोपीने केली. या कारणावरुन ज्येष्ठ नागरिकाने ‘तुम्ही मोबाइल संच कुठून आणतात’, अशी विचारणा आरोपीकडे केली. आरोपीने शेजारी असलेल्या भंगार माल दुकानातून पाईप घेऊन ज्येष्ठाला मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

मोटार चालकाला अडवून मारहाण

मोटार चालकाला अडवून मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील माळवाडी रस्त्यावर घडली. दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी मोटारीची काच फोडून टायरमध्ये तीक्ष्ण वस्तू खुपसून टायरचे नुकसान केले. याप्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मोटार चालकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २४ जून रोजी दुपारी मोटार चालक हडपसर भागातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी मोटार अडवली. काही कारण नसताना मारहाण केली. मोटारीची काच फोडून टायरमध्ये अणुकुचीदार वस्तू खुपसली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस शिपाई मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×