Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची २५ लाखांची फसवणूक

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

कोढवा पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विमा पाॅलिसी अद्ययावत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोढवा पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे कोंढवा भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपर्क साधला होता.

लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणार्‍या सराईतांना अटक – सविस्तर बातमी

आयुर्विमा पाॅलिसी अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रे, तसेच शुल्क भरावे लागणार आहे, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर चोरट्यांनी बतावणी करुन त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. गेल्या आठ महिन्यात चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी २५ लाख ११ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क भागातील एका तरुणाची २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केली. तरुणाने रकम गुंतविल्याानंतर चोरट्यांनी त्याला परतावा, तसेच मुद्दलही दिली नाही. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×