खराडी भागातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाा विरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिल जनार्दन इखनकर (वय ७५, रा. सुनीतानगर, बाँम्बे सॅपर्स काॅलनीशेजारी, वडगाव शेरी) असे मृ्त्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी नवनाथ जगताप यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वारजे भागात तरुणाला लुटणारे चाेरटे गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार इखनकर हे शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास खराडीतील रेडिसन ब्ल्यू हाॅटेलजवळील चौकातून निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार इखनकर यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पो चालक पसार झाला. पसार झालेल्या टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करत आहेत.
शहर परिसरात आठवडभरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवडभरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.




















