Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

ज्येष्ठाकडून रुग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग

ज्येष्ठाकडून रुग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग

विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठाकडून रुग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग – ज्येष्ठाकडून रूग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका ७३ वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊसतोडणीला न आल्याने मजुराचे अपहरण करणारे अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मध्यभागातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट आहे. ३ जुलै रोजी ज्येष्ठ रुग्णालयात आला होता. त्यावेळी तरुणी एकटीच रुग्णालयात होती. तरुणी एकटी असल्याची संधी साधून ज्येष्ठाने तिच्याशी अश्लील वर्तन केले. ज्येष्ठाने अश्लील वर्तन केल्याने तरुणी घाबरली. ती क्लिनिकमधून बाहेर पळाली. त्यानंतर ज्येष्ठाने तिला गाठले. ‘उद्या क्लिनिकमध्ये आहे का ?’, अशी विचारणा केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

तरुणीचा विनयभंग करणे, तसेच मानसिक त्रास दिल्याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेेले चित्रीकरण तपासले असून, पाेलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×