Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात शरद पोंक्षे यांना ‘व्होकेशनल अवॉर्ड’ने होणार सन्मान

संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण; २० – २१ डिसेंबरला कोथरूड येथे संमेलन

marathinews24.com

पुणे – सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांचा व्होकेशनल अवॉर्डने सन्मान केला जाणार आहे.

पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ता निर्मितीला मान्यता – सविस्तर बातमी

संमेलन शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. व्होकेशनल अवॉर्डचे वितरण श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक, व्याख्याते संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलन प्रमुख मधुमिता बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

वाचन संस्कृतीची निकोप वाढ व्हावी, रोटेरियन्समध्ये साहित्याची अभिरुची वाढावी आणि रसिकांना साहित्याच्या माध्यमातून निखळ आनंद घेता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रासह बारा सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या संमेलनात नामवंत साहित्यिक, कलावंत, अभ्यासक, विचारवंत, कवी यांचा सहभाग असणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×