धक्कादायक.. मातेनेच केला ११ वर्षांच्या मुलाचा खून

अल्पवयीन मुलीवरही केला चाकूने वार; वाघोलीतील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – आईने ११ वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. आईने १३ वर्षीय मुलीवर चाकूने वार केले. हल्ल्यात घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईराज संतोष जायभाय (वय ११) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सोनी संतोष जायभाय हिला अटक केली आहे. सोनीने १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावर चाकूने वार केले. घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी

‘सोनी जायभाय मूळची नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवासी आहे. जायभाय कुटुंबीय सध्या वाघोलीतील बायफ रस्त्यावर राहायला आहेे. सोनीने हे कृत्य का केले, याची निश्चित माहिती समजली नाही. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. चौकशीत खूनामागचे निश्चित कारण समजेल’, अशी माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेला साईराज आणि त्याची बहीण धनश्री यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच साईराज याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सोनी जायभायने ११ वर्षाच्या मुलाचा खून करुन मुलीवर चाकूने वार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. पोलीस निरीक्षक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×