धक्कादायक; पोटच्या लेकीचे आईनेच रेकॉर्ड केले नग्न व्हिडिओ…

बॉयफ्रेंडसह इतर नातेवाईकांना पाठवले होते व्हिडिओ, फरार महिलेसह प्रियकरासह बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक

Marathinews24.com

पुणे – पोटच्या लेकीचे आईनेच लपून छपून नग्न व्हिडिओ काढून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बिबवेवाडीमध्ये घडला आहे. संबंधित व्हिडीओ आरोपी महिलेने स्वतःच्या बहिणीसह इतर नातेवाईकांना पाठवले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, आईने तिच्या प्रियकरासोबत पळ काढला होता. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपासाद्वारे खडकवासला परिसरातून शनिवारी (दि. १२) आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

परदेशी पर्यटकाला खाऊ घातली तंबाखू, मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती नक्की काय घडलं…सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने तिच्या आई विरोधात ३ महिन्यांपूर्वी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मुलीच्या आईनेच तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते स्वतः च्या बहिणीसह इतर नातेवाईकांसह बॉयफ्रेंडला पाठवले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी महिला तिच्या प्रियकरासह पसार झाली. पोलिसांनी तांत्रिक तपासावरून सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि दौंड परिसरात आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. अखेर १० दिवसांपूर्वी त्यांचे लोकेशन खडकवासला असल्याचे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला समजले. त्यानुसार पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

अफेयरची माहिती घरमालकाला दिली, रागातून मुलीचे नग्न व्हिडीओ केले रेकॉर्ड

अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती झाली होती. याबाबत तिने घरमालकाला सांगितले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी आईने असे कृत्य केल्याची माहिती सुत्रांनी दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंके
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस कर्मचारी रक्षित काळे, गायकवाड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top