Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

धक्कादायक…प्रेमाला विरोध केल्याने तरुणाचा खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

कात्रज घाटातील खून प्रकरणाचा उलगडा; ग्रामीण पोलिसांकडून तिघे अटकेत

marathinews24.com

पुणे – प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, याप्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३ मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणाचा राजगड पोलिसांनी तपास करुन गुन्ह्याचा छडा लावला.

जीवे मारण्याची धमकी देउन ट्रक चोरला, दोघांना अटक – सविस्तर बातमी

सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ),नितीन त्रंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मुळ रा. खुठे गाव, ता. अवसा, जि. लातूर) यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती तेथे फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर राजगड पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी चैाकशी करुन मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा मृतदेह सौरभ आठवले याचा असल्याची माहिती मिळाली. सौरभ १८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी राजगड पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी सौरभचे मित्र, नातेवाईकांकडे चौकशी केली. तेव्हा खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नव्हते.

तांत्रिक तपासात सौरभचा खून अल्पवयीनांनी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी नलावडे यांना मिळाली. आरोपी कात्रज घाट परिसरातील गोगलवाडी येणार असल्याची मााहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथखाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. मांगडेवाडी परिसरात अल्पवयीन त्याच्या आत्याकडे राहत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. सौरभ याच परिसरात राहत होता. तो मुलीला बहिण मानायचाा. तो तिला रोज शाळेत सोडायचा. त्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती आई-वडिलांना दिली.

त्यानंतर अल्पवयीन मुलगा आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे राहायला गेला. सौरभमुळे प्रेमसंबंधात अडथळे आल्याने अल्पवयीन चिडला होता. त्याने साथीदारांच्या मदतीने सौरभच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर सौरभला त्यांनी कात्रज बोगद्याजवळ भेटण्यास बोलविले. सौरभला डोेंगरावर नेऊन आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलीस तपासात ही माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त केल्या. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ही कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुल कोल्हे,अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अजित मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भंडाळे, मंगेश कुंभार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×