Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा अंकुश भडंग मानकरी

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे आयोजन

marathinews24.com

पंढरपूर – जालना येथील अंकुश भडंग हे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे मानकरी ठरले, ७० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील परभणी येथील सखाराम नजान यांनी ज्येष्ठ वारकरी महावीर किताब मिळवला, तर १६ ते २५ वयोगटातील धाराशिव येथील प्रकाश धायगुडे हे कुमार वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले. मानाचा फेटा, माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक, रोख रक्कम व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, मावळ, धाराशिव, जालना, औसा, लातूर व कर्नाटक येथील जवळपास ३०० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला. (श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा अंकुश भडंग मानकरी)

जिल्हास्तरीय ‌‘अमृतप्रभा समूहगान‌’ स्पर्धेचे आयोजन – सविस्तर बातमी

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

यावेळी हिंदकेसरी पै.दिनानाथ सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. हभप. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, महाराष्ट्र केसरी विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डॉ. एस. एन. पठाण, शिवम गुरूजी, डॉ. विश्वजीत नागरगोजे, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे व डॉ. टी. एन. मोरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.

बाबा निम्हण यांनी या स्पर्धेचे धावते समालोचन केले. तर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, नितीन शिंदे, दत्ता माने, बाबा मते , जितेंद्र कणसे, अमोल नरळे, तानाजी केतरे, निखिल वणवे, राहुल बिराजदार, बाळासाहेब सणस, सुरेश मुंडे आणि नितिन लावंड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.प्रा. विलास कथुरे यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केली.

विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणे
(प्रथम सुवर्ण
द्वितीय रौप्य पदक
तृतीय कांस्य पदक)

१६ ते २५ (वयोगट)
प्रकाश धायगुडे(धाराशिव)
राघोजी कदम (नांदेड)
गणेश इंगळे (नांदेड)

२६ ते ३५ वयोगट
लक्ष्मण करे (बीड)
सचिन नरळे (सोलापूर)
भास्कर कदम (नांदेड )

३६ ते ४५ वयोगट
सचिन शिंदे (सोलापूर)
नागनाथ अलेवांर (हिगोली)
शेकुराम म्हस्के (हिंगोली )

४६ ते ५५ वयोगट
संतोष शिंदे (नांदेड)
मच्छिंद्र वेताळ (संभाजीनगर)
लक्ष्मण शिंदे (नांदेड)

५६ ते ६५ वयोगट
अंकुश भडंग (जालना)
किसन नरळे (सोलापूर)
शंकर आडकर (मावळ)

७० वर्षा पुढील वयोगट
सखाराम नजान (परभणी)
कमलाकर मुळे (लातूर)
शिवाजी मोरे (धाराशिव)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×