वानवडी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – मॅफेड्रॉनची विक्री करणाऱ्या तस्कराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७ ग्रॅम एमडी, दुचाकी असा पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रोहन प्रकाश अंगारके (वय २२, रा. गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे) त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कलम ८(क), २१(ब), २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
व्यापाऱ्याला धमकावून ४५ हजारांची रोकड लुटली – सविस्तर बातमी
वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दीपक क्षीरसागर आणि अभिजित चव्हाण यांना लुल्ला नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण संशयास्पद दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वानवडी तपास पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. संबंधिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने काही अंतरावर त्याला ताब्यात घेत ७ ग्रॅम एमडी, दुचाकी जप्त केले आहे.
मेफेड्रोन तस्कराला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकांत विभागणी करीत सापळा रचला होता. आरोपी रोहन अंगारके (वय २२) याच्याकडून ७ ग्रॅम मॅफेड्रॉन, दुचाकी, मोबाईल असा पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, बालाजी वाघमारे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर यांनी केली. वानवडी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांना धडा मिळाला आहे.




















