भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी, लोहगाव परिसरात घडला अपघात
Marathinews24.com
पुणे- भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगल रामराव काळे (वय ४२, रा. मोझेनगर, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याबाबत रामराव दत्तराव काळे (वय ५२) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक ज्ञानेश्वर आसाराम काळे (वय ३६, रा. तनिष्का वाटिका सोसायटी, आळंदी) याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
बातम्यांच्या दुनियेतून बाहेर पडताना, अरुण मेहेत्रे यांचा अखेरचा रिपोर्ट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंगल काळे ११ एप्रिलला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कामावरुन घरी निघाल्या होत्या. लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्यावर भरधाव मोटारीने पाठीमागून दुचाकीस्वार काळे यांना धडक दिली. अपघातात काळे यांना गंभीर दुखापत झाली. काळे यांचे डोळ्यांना इजा पोहोचली, तसेच त्यांची हनुवटी आणि खुबा फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस हवालदार निलेश साळवे तपास करत आहेत.