Breking News
Crime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणीकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरीप्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'संवादवारी'च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी  पंढरपूरकडे मार्गस्थ

marathinews24.com

पुणेडोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या ‘संवादवारी’कडेही वळत आहेत.

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी  करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. यापूर्वी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची, बारामती आणि सणसर येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

'संवादवारी'च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्ररथाचे विशेष आकर्षण

पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत. चित्ररथावर दर्शनी भागावरील लामणदिवा, तुळशी वृंदावनाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात.

चित्ररथरथाची रचना आणि त्यावर कलात्मकतेने दिलेली माहिती वारकरी बांधव कुतूहलाने पाहत आहेत. कलापथकाच्या सादरीकरणाला टाळ्या मिळत असून योजनांची माहिती व मनोरंजन अशी सांगड घातली जात आहे.

वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही गर्दी दिसून येत आहे.

वारकरी आणि नागरिक प्रदर्शनाला आवर्जुन भेट देत असून योजनांची माहिती जाणून घेत आहेत. प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या नवीन माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या वारकऱ्यांना योजनांची माहिती देणारे पत्रके वितरण करण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यात २८ जून रोजी निमगाव केतकी आणि २९ जून रोजी इंदापूर पालखी तळ येथे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनात विविध योजनांची माहिती

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे.

'संवादवारी'च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

बाळासाहेब कुंजीर, मु. वळती, ता. हवेली  ‘आषाढी वारीतील ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत भरविण्यात आलेले प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, याबद्दल राज्य शासनाचे आभार मानतो.’

ह.भ.प. ज्योतिराव कांबळे, मसला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने राज्यशासनाच्या योजनांची नागरिकांना माहिती होऊन त्यांना या योजनांचा लाभ मिळण्याकरिता आषाढीवारीत संवादवारी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके, तरुणवर्गाकरिता योजना आहेत.अशाच प्रकारे नागरिकांना योजनांची माहिती देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top