आरोपी विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती मॉडेल कॉलनी परिसरात कॅनॉल रोडजवळ एका भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना २२ सप्टेंबरला रात्री साडे दहाच्या सुमारास मॉडेल कॉलनीत घडली आहे. अमानुष कृत्याचा व्हिडिओ प्राणी प्रेमी नागरिकांच्या हाती लागला असून, घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपी विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅफेड्रॉनची विक्री करणाऱ्या तस्कराला अटक – सविस्तर बातमी
प्राणीप्रेमी स्वयंसेवक संजय शिंदे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार श्यामराव धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणिप्रेमी संजय शिंदे, भाग्येंद्र चुडासामा, रॉजर जोसेफ साहिल करांडे आहेत. ते दररोज मॉडेल कॉलनी परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात. दरम्यान, २२ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आरोपी धोत्रे याने कुत्र्यावर अत्याचार केला. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ प्राणिप्रेमी संघटनेच्या हाती लागला. त्यांनी तत्काळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यात संपर्क साधत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आणि एपीआय अनिकेत पोटे यांनी कारवाई करत या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल केला.




















