Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

कामावरुन काढून टाकल्याने एकाची आत्महत्या

तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता

marathinews24.com

पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नवी पेठेत घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सागर सुभाष पवार (वय २६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

‘सागर मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुण्यात राहत असून, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. नवी पेठेत तो मित्रांबरोबर राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्याच्या मित्रांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सागरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले’, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.

‘आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पाेलिसांनी त्याच्या मित्रांकडे चैाकशी केली. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केेल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, असे पोलीस निरीक्षक कसबे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×