पुण्यात आमदाराच्या पोलीस गार्डला धक्काबुक्कीची चर्चा

पुण्यात आमदाराच्या पोलीस गार्डला धक्काबुक्कीची चर्चा

गणेश विसर्जनाच्या दिवशी हाॅटेलमध्ये वाद

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जनाच्या दिवशी गंगाधाम-लुल्लानगर रस्त्यावर असलेल्या हाॅटेलमध्ये दोन गटात वाद झाला. त्यावेळी तेथे असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराबरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला (गार्ड) धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. वादावादीच्या घटनेनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विसर्जनाच्या दिवशी गंगाधाम-लुल्लानगर रस्त्यावरील हाॅटेलमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार कार्यकर्त्यांसोबत जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदारांबरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा काही जणांशी वाद झाला.

पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार – सविस्तर बातमी 

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली. घटनेनंतर तेथे आलेल्या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्याला मारहाण केली. संबंधित हाॅटेल वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून, तीन दिवसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अद्याप कोणतीही तक्रार झाली नाही. तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले. या हाॅटेलमध्ये आमदार जेवायला आले होते. त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे काही जणांशी वाद झाला. वादातून हाॅटेलमधील ग्लास फुटले, अशी माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×