सागर ढोले पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
marathinews24.com
पुणे – ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स तर्फे शिक्षक दिन मा. चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विभाग प्रमुख व प्राचार्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक दिनाचे महत्त्व या विषयावरील भाषणाने झाली. त्यानंतर मनमोहक वाद्यवृंद, सामूहिक गान व नृत्य सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेल्या विशेष शीर्षकांमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.
पुण्यातील अली दारूवाला यांना पहिला दारा शिकोह राष्ट्रीय पुरस्कार प्रदान – सविस्तर बातमी
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते अतूट असावे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक बांधील राहिले पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनीही पालक व शिक्षकांचा सन्मान राखून आदर्श वर्तन ठेवावे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या आरंभ गटाचे आभार मानले.
























