सोशल मीडियावर आक्षेपार्ह केली पोस्ट, यवतमध्ये दोन गटात तणाव

सोशल मीडियावर आक्षेपार्ह केली पोस्ट, यवतमध्ये दोन गटात तणाव

जाळपोळ अन दगडफेक

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर आक्षेपार्ह केली पोस्ट, यवतमध्ये दोन गटात तणाव – मुस्लिम मुलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यामुळे दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात प्रचंड तणाव निर्माण झाल्याची घटना १ ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास घडली. त्यानंतर दोन गटात झालेल्या राड्यात वाहनांसह बेकरीच्या दुकानाची जाळफोड केली. दगड फेकीमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे आठवडी बाजारही रद्द करण्यात आला. पोलिसांनी अश्रुधूर नळकांड्या फोडून जमाव पांगविला असून, परिसरात शांतता आहे.

सायबर चोरट्यांकडून १ कोटी २० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना २६ जुलैला यवतमध्ये नीळकंठेश्वर महाराजांच्या मंदीर प्रांगणात झाली होती. त्यापार्श्वभूमीवर ३१ जुलैला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि. १ ) ऑगस्टला एका मुस्लीम तरूणाने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट केली. त्याची माहिती यवत पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यवत गावातील दोन गटात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत जमावाने एकमेकांवर दगडफेड करीत जाळपोळ केली. बेकरीचे दुकान पेटवून देत, दुचाकी, मोटारीलाही आग लावली होती.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह केली पोस्ट, यवतमध्ये दोन गटात तणाव

पोलिसांनी अश्रुधूर नळकांड्या फोडून गर्दी पांगविली. सध्यस्थितीत गावात तणावपुर्ण शांतता असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून यवतमध्ये तणाव असून, दोन गटातील संघर्ष टोकाला पोहचला होता. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून जमावाने एकाची बेकरी पेटवून दिली. त्यानंतर दुचाकीसह मोटारीला आग लावल्याचे दिसून आले होते. काही  वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी अमिन पापा सय्यद (वय ३२ रा. यवत ता. दौंड) याच्यासह साथीदाराला अटक केली आहे. त्यानंतर त्याच अनुषंगाने १ ऑगस्टला सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हायरल पोस्ट करणार्‍यालाही ताब्यात घेतले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात उद्रेक झाल्याचे दिसून आले. यवतमध्ये दुचाकी मोटारीसह दुकान पेटवून दिली होती. त्यानंतर दोन गटात दगडफेक झाली होती. त्यामुळे सहा ते सात वाहनांचे नुकसान झाले. रस्त्यात टायर पेटवून निषेध करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, २६ जुलैपासून दोन गटात तणाव असतानाही, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी संबंधिताला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यवतमध्ये तणाव वाढला होता. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गावात शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरवू नका, नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. -संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

मोबाइलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला होता. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात असून, दोन्ही समाजातील लोकांमध्ये शांततेसंदर्भात बैठक पार पडली आहे. जाणीवपुर्वक काही लोक तणाव निर्माण होईल असे स्टेटस ठेवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने धर्मावर टीका करण्याचे कोणालाही अधिकार नाहीत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×