Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

आजपासून बीड जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी

आजपासून बीड जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी

मस्साजोगकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या ११ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये अंबाजोगाई, धारूर, बीड, पाटोदा, परळी, वडवणी, माजलगाव, गेवराई, शिरूर, आष्टी, केज या तालुक्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आजपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत असून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार ७ ते १३ एप्रिल कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करु शकणार आहेत.

मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांतील सुरक्षेबाबत लक्ष देणे अत्यावश्यक – सविस्तर बातमी 

निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदार याद्या यापूर्वीच उपलब्ध करून दिल्या आहेत. संबंधित याद्या संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि गावातील तलाठी कार्यालयांच्या सूचना फलकावर लावल्या आहेत. दरम्यान, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमध्ये मस्साजोगच्या ग्रामपंचायतचा समावेश आहे त्यामुळे मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार की कशी होणार हे दोन ते तीन दिवसात समजणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष जिल्ह्यातील मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीकडे लागले आहे.

ग्रा .पं निवडणूकीसाठी आवश्यक कागदपत्रे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मतदार यादीतील नावाची सांक्षाकित प्रत, उमेदवार दुसऱ्या प्रभागातील असल्यास त्या बाबतचा उतारा, उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा, थकबाकी नसल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, शौचालय वापराबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, २ पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतचा दाखला, अतिक्रमण नसल्याबाबतचा दाखला, अशी कागदपत्रे असणे गरजेचे.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया-

१)प्रश्न. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पदासाठीच्या निवडणूकीसाठी कसा अर्ज करावा

उत्तर. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन आहे. तो अर्ज निवडणूक विभागात जमा करावा लागेल.

२)प्रश्न. कुणबी प्रमाणपत्र असेल तर ओबीसी जागेवर अर्ज भरता येईल का

उत्तर. होय, कुणबी प्रमाणपत्र असल्यास ओबीसी जागेवर अर्ज भरता येणार आहे .

३)प्रश्न. जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर अर्ज भरता येतो का

उत्तर. जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल मात्र त्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्याची पोहच पावती जोडून अर्ज करता येतो. निवडूण आल्यानंतर ६ महिन्यांत पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागते.

कसा आहे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम-

•नामनिर्देशनपत्र सादर करणेः ७ ते १३ एप्रिल. यामध्ये ११ आणि १२ एप्रिल रोजी सुटी आहे.

•अर्जाची छाननीः १५ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून छाननी प्रक्रिया पार पडेल.

•मतदानः २८ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल.

•निकाल: २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल.

मस्साजोग निवडणुकीकडे लक्ष

राज्यात बहुचर्चेचा विषय बनलेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची १६ महिन्यांपूर्वी समाजातील काही समाजकंटक राक्षस वृत्तीच्या लोकांकडून निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला १६ महिने झाले आहे. पोट निवडणुकीत मस्साजोगचाही समावेश आहे. आता मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे आणि मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार की अन्य कोण व्यक्ती निवडणूक लढविणार हे येत्या दोन ते तीन दिवसात समजणार आहे . त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे.

धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा

दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली असता धनंजय म्हणाले रणनीती काहीच नाहीये जे काम दिवंगत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांनी केली आहे. तोच मानस सर्व गावकऱ्यांचा असणार आहे, यापुढेही तसंच काम आणि आज पासून जी पोटनिवडणुकीची सुरुवात आहे तर मागच्या काही दिवसापासून सर्व आजी-माजी जेष्ठ लोक आणि युवक यांचे काय मत आहे. त्या मतावर जे देशमुख कुटुंबीय आहे. त्यांचे काय विचार आहेत व त्यांच्या काही सूचना आहेत त्यावरच आम्ही थांबल्यालो आहेत .आणि येणाऱ्या एक किंवा दोन दिवसात या निवडणुकीच्या गोष्टी स्पष्ट होतील.

गावातील आजी माझी व ज्येष्ठ लोक आहेत आणि मागच्या २०२२ च्या निवडणुकीमध्ये जे पॅनल प्रमुख होते ते आणि जे सदस्य झालेले आहेत ते सर्व लोक गावामध्ये जमून निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जो राहिलेला अठरा महिन्यांचा ग्रामपंचायत चा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांचा राहिल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×