Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

पुण्यात पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित

marathinews24.com

पुणे – शहरातील बी.एम.सी.सी. कॉलेज येथील टाटा हॉलमध्ये पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा बाकलीवाल ट्युटोरियल्स आणि किंग्स इंडियन चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र भरातील तरुण खेळाडूंनी बुद्धिमत्ता, रणनीती उत्साह आणि ऊर्जेचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला आहे.

“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन – सविस्तर बातमी 

एकूण ३१० खेळाडूंनी तीन गटांमध्ये १६, १४ आणि १२ वर्षे वयोगटाखालील असणाऱ्या खेळाडूंनी आपले कौशल्य आणि स्पर्धात्मकता प्रदर्शित केली. सात फेऱ्यांच्या या रॅपिड फॉरमॅटमध्ये प्रत्येक खेळाडूस १५ मिनिटे + प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असा वेळ दिला गेला होता, जेणेकरून खेळाडूंनी झपाट्याने विचार करून आपली रणनीतीक कौशल्याची मांडणी करून आपले कौशल्य दाखविले पाहिजे.

स्पर्धेचे उद्घाटन फिडे मास्टर गौरव बाकलीवाल यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले कि, खेळाडूवृत्ती, चिकाटी आणि निश्चय या तीन महत्वाच्या भूमिका चेस खेळताना खेळाडूंनी आत्मसात करायला पाहिजे तरच ते खेळाडू बुद्धिबळ सारख्या स्पर्धेत आपला ठसा उमटवू शकतात.

बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल यांनी आंतरराष्ट्रीय चेस मास्टर अक्षय बोरगावकर (सध्या बी. टी. चा इयत्ता ११ वी चा विद्यार्थी) याच्याशी रोचक संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बुद्धिबळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर संबंध मांडले आणि बुद्धिबळामुळे विकसित होणारी विश्लेषणात्मक विचारसरणी, संयम व समस्यासोपीकरण कौशल्ये ही शैक्षणिक उत्कृष्टता तसेच २१व्या शतकातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील यशासाठी कशी उपयुक्त ठरतात, हे अधोरेखित केले.

सहभागी खेळाडूंना काही आकर्षक बुद्धिबळ आणि तर्कशास्त्रावर आधारित कोडी व प्रश्न विचारले, ज्यांचा प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला पालक, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम पुण्यातील तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. आयोजकांनी सर्व खेळाडू, पालक, स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. स्पर्धा दरवर्षी साजरी करून येणाऱ्या नवीन तरुण पिढीच्या बुद्धिमत्ता आणि रणनीतिक उत्कृष्टतेची परंपरा म्हणून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

विजेते खालील प्रमाणे

16 वर्षाखालील गट (या गटातील सर्व विजेते बाकलीवाल टिटोरिअलचे विद्यार्थी आहेत)
1. विहान दावडा (FIDE रेटिंग – 1871, गुण 6.5/7)
2. ओजस देवशतवार (FIDE रेटिंग – 1778, गुण 6/7)
3. CM अर्णव कदम (FIDE रेटिंग – 1867, गुण 6/7)

14 वर्षाखालील गट

1. लाथिक राम (FIDE रेटिंग – 1896, गुण 6/7)
2. भुवन कोंनूर (FIDE रेटिंग – 1545, गुण 6/7)
3. AFM इशान कदम (FIDE रेटिंग – 1520, गुण 6/7)

12 वर्षाखालील गट

1. अविरत चौहान (FIDE रेटिंग – 2071, गुण 7/7)
2. शितिज प्रसाद (FIDE रेटिंग – 1783, गुण 6/7)
3. कविन मथियाझगन (FIDE रेटिंग – 1533, गुण 6/7)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×