पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मत
marathinews24.com
पुणे – शहरातील महिलांसह समाजाची सुरक्षा ही पोलीस प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे, विशेषतः तरुणांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित मॉडर्न महाविद्यालयात आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान : विशेष जागृती कार्यक्रमात’ ते बोलत होते.
शेअर मार्केटसह आयपीओमधील गुंतवणूक पडली ५१ लाखांना – सविस्तर बातमी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहणे पसंद करावे. अन्यथा पोलिसांना ‘पोलीसी खाक्या’चा वापर करावा लागू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, विकसित भारत घडविण्याची खरी ताकद आजच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांच्या योग्य दिशादर्शनासाठी शैक्षणिक संस्था सतत प्रयत्नशील राहायला हव्यात, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह प्रा. डॉ. जोत्स्ना एकबोटे होत्या. आजचा युवा वर्ग हा भारताचे भविष्य आहे. ही युवा पिढी सक्षम करण्यासाठी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था नेहमीच कार्यशील राहिले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तरुण विद्यार्थ्यांनी प्रारंभापासूनच नशेपासून मुक्त राहणे आवश्यक आहे, ही भूमिका मांडली.



















