पिस्तूलासह ०७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल व इतर साहित्य जप्त
marathinews24.com
पुणे – शस्त्राच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या टोळक्याला बेड्या, चतु:शृंगी पोलिसांची कामगिरी, त्यांच्याकडून पिस्तूलासह ०७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये तीन कोयते व एक चारचाकी गाडी, दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध; महापालिकेसमोर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चे धरणे सविस्तर बातमी
प्रतीक सुनिल कदम (वय २६), अमीर अल्लाउददीन शेख (वय २८), अतुल श्याम चव्हाण (वय २७), रॉबीन दिनेश साळवे (वय २६), समीर अल्लाउददीन शेख (वय २६) जय सुनिल चेंगट (वय २१) अभिषेक अरुण आवळे (वय २४ सर्व रा. औंध, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हे दि. २८ जुनला मध्यरात्री औंध येथील विधाते वस्ती याठिकाणी मित्रांसोबत गप्पा मारत होते. त्याठिकाणी १२ ते १५ आरोपींनी हातामध्ये लाकडी दांडके व हत्यारे घेवुन येवुन त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवत भागात दहशत निर्माण केली. तक्रारदारसह त्यांच्या मित्रांना हत्याराने, दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सहायक पोलिस निरक्षक नरेंद्र पाटील, सहायक पोलिस निरक्षक अनिकेत पोटे व तपास पथकामधील अंमलदार यांनी आरोपींची माहिती प्राप्त करून मुळशी भागामधून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन येथे वेगेवेगेळे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननवरे, सहायक पोलिस निरक्षक नरेंद्र पाटील, सहायक पोलिस निरक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर, वाघेश कांबळे व सुरज खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.