वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंढवा चौकात वाहतुकीत बदल

मुंढवा चौकातील वाहतूक कोंडीसाठी मार्गक्रमणात बदल

Marathinews24.com

पुणे– शहरातील मुंढवा चौकातील वाहतुकी कोंडी कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सिग्नल बंद करण्यात आला आहे. परिसरात वाहतुक निरतंर सुरु राहण्यासाठी वाहतुक विभागाने मुंढवा चौकात बदल केला असल्याची माहिती वाहतुक विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. मुंढवा चौकातील हडपसर, खराडी वाहतुक सरळ सुरळीत चालू राहण्यासाठी घोरपडी बाजूने केशननगर, मांजरी हडपसरकडे जाणार्‍या वाहनांनासाठी मुंढवा चौकातून डाव्या बाजूस स्मशानभूमी मुंढवा येथे यु टर्न घेवून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

बस, टेम्पो यासारख्या वाहनांनी यु टर्न न घेता पुढे साईनाथनगर येथे जावून यु टर्न घेवून मार्गस्थ व्हावे. तर केशननगरकडून खराडी, कोरेगांव पार्क कडे जाणार्‍या वाहनांनी मुंढवा चौकात डाव्या बाजूस जावून मुंढवा रेल्वेपुल अंडरपास मधुन यु टर्न घेवून इच्छितस्थळी जावे. बस, टेम्पो यासारख्या वाहनांनी नमूद अंडरपास मधून युटर्न न घेता पुढील रेल्वे ब्रिज खालुन युटर्न घेवून इच्छितस्थळीमार्गस्थ होतील.नागरीकांना काही सुचना असल्यास त्यांनी येरवडा वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top