Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ईद-ए-मिलादनिमित्त वाहतूक बदल

ईद-ए-मिलादनिमित्त वाहतूक बदल

लष्कर परिसर, तसेच मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

marathinews24.com

पुणे – महंमद पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) सोमवारी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त लष्कर परिसर, तसेच मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ सोमवारी (८ सप्टेंबर) नाना पेठेतील मनुशा मशिद येथून होणार आहे. संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पद्मजी पोलीस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामन तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशीद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, गांव कसाब मशीद, मुक्तीफौज चौक, पूलगेट चैाक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी, सरबतावाला चौक, क्वार्टर गेट चौक, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक वाहतूक वळवली आहे.

गणेशोत्सवात निर्माल्य टू निसर्ग उपक्रम, ११४ टन निर्मल्याचे संकलन – सविस्तर बातमी 

नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, डावीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गाने मिरवणूक जाणार आहे. शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येतील. मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

खडकी भागात वाहतूक बदल

खडकी भागातून सोमवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आसुडखाना चौक, होले रस्ता, नवीन तालीम चौक, गोपी चौक, टांगा स्टँड चौक, क्राऊन हाॅटेल, टिकाराम चौक, महाराष्ट्र बँक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशीद चौक या मार्गाने मिरवणूक जाणार आहे. खडकी बाजार येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×