Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

वाहतूक शाखेतील पोलीस हवालदारा नेघेतला गळफास

वाहतूक शाखेतील पोलीस हवालदारा नेघेतला गळफास

लोहगाव भागातील घटना 

marathinews24.com

पुणे – पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात घडली. त्यांच्याआत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सायबर चोरट्यांकडून १ कोटी ११ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

मुले दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला, मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×