वारजे परिसरात चोरीचा सुळसुळाट, एकाच सोसायटीत दोन फ्लॅट लुटले
Marathinews24.com
पुणे – शहरातील वारजे भागात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ढोरे (वय २९, रा. राहुल निसर्ग सोसायटी, अतुलनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोरे राहुल निसर्ग सोसायटीत राहायला आहेत. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी ढोरे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील चार लाख १४ हजारांचे दागिने चोरण्यात आले, तसेच याच सोसायटीतील रहिवासी प्रसाद जोशी यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ५० हजारांची रोकड आणि दागिने असा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.