Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

दुचाकी चोरट्याचे वय अवघे ६७; रिव्हाॅल्वरसह १० काडतुसे जप्त

दुचाकी चोरट्याचे वय अवघे ६७; रिव्हाॅल्वरसह १० काडतुसे जप्त

चोरट्याला पोलिसांनी बिबवेवाडी भागातून केली अटक

marathinews24.com

पुणे – लोणी काळभोर भागातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी बिबवेवाडी भागातून अटक केली. पोलिसांनी चोरट्याकडून दुचाकी जप्त केली, तसेच त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून रिव्हाॅल्वरसह १० काडतुसे, ३० चाव्या जप्त करण्यात आल्या. अरूण बाबुराव देशमुख (वय ६७, रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

लोणी काळभोर भागातून १७ ऑक्टोबरला दुचाकी चोरीला गेली होती. संबंधित गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू करण्यात आला. तपासात चोरटा लोणी काळभोर परिसरातून बिबवेवाडीकडे गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने देशमुखला सुखसागरनगर भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली. तपासात त्याच्याकडे पिस्तुल, काडतुसे असल्याची माहिती मिळाली. रिव्हाॅल्वर आणि काडतुसे त्याने घरात पिशवीत लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून पिशवी जप्त केली. पिशवीतून रिव्हाॅल्वर, १० काडतुसे, ३० चाव्या जप्त केल्या.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, सातपुते, शिरगरे, कुदळे, पाटील, माने यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×