टँकर रिव्हर्स घेताना दोन वर्षीय चिमुरड्याचा करून अंत…

पुण्यातील गणपती माथा परिसरातील दुर्दैवी घटना, चालकाला अटक

Marathinews24.com

पुणे- पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाने बेदरकारपणे वाहन मागे घेत असताना झालेल्या अपघातात दोन वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. ही घटना ५ एप्रिलला सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील गणपती माथा याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दरवाजे उघडे ठेवणे पडले महागात सव्वातीन लाखाची चोरी – सविस्तर बातमी

वारजेतील एका सोसायटीतील अरूंद गल्लीमध्ये पाणी टाकून टँकर चालक माघारी जात होता. चालकाने तेथील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, आजूबाजूचे लोक करत असलेल्या हातवाऱ्याकडे दुर्लक्ष केले. टँकर बेदरकारपणे रिव्हर्स घेतला . त्यावेळी टॅंकरच्या मागच्या चाकाखाली दोन वर्षाचा मुलगा सापडून त्याचा करूण अंत झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून टॅंकर चालकास अटक केली आहे. ससून रुग्णालयात बालकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. शव नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहे. या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश होता. मध्यरात्री बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यावेळी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

मनोरंजन

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top