वानवडी पोलीसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे– रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन गावठी बनावटीचे पिस्टल, २ काडतुसे जप्त करण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. ओंकार उर्फ बद्या प्रकाश बदे ( वय २६ रा. डॉ. रमा मनोहर लोहियानगर वसाहत, लोहिया गार्डनसमोर, मगरपट्टा चौक, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सराईत गुन्हेगारासह त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सूचना दिल्या आहेत.
पुणे : कुस्तीच्या आखाड्यात वादातून हाणामारी – सविस्तर बातमी
रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवुन, त्यांचे बेकायदेशीर कृत्यास तत्काळ प्रतिबंध करीत कायदेशीर कारवाईचे आदेस दिले आहे. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्याचे तपास पथक २४ एप्रिलला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तपास पथकाचे पोलीस अंमलदार यतीन भोसले व गोपाळ मदने यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार बधे हा हडपसरमध्ये सुटींग रेजजवळ दुचाकी गाडीवर एकटाच थांबल्याची माहिती मिळाली. तो संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने कब्जात चिजवस्तु बाळगुन वावरत असुन ते अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता होती. वरिष्ठांचे परवानगीने तपासपथकातील स्टाफसह छापा कारवाईसाठी वेगवेगळयां टिमप्रमाणे प्रत्येक गाडीवर त्याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी संशयितरित्या दुचाकीवर बसलेला दिसला.
पोलीसांची चाहुल लागताच तो दुचाकी चालु करुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना लागलीच पोलीसांनी त्यास पकडले. ओंकार उर्फ बद्या प्रकाश बदे (वय २६) असे नाव त्याने सांगितले. पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे, दुचाकी व रोख रक्कम असा ऐवज जप्त केला. जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हे दहशत निर्माण करण्यासाठी आणल्याची कबुली त्याने दिली.
त्याच्याविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७६/२०२५ भारतीय शस्त्र अधि कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक धनाजी टोणे हे करीत आहेत. आरोपी याच्यावर यापुर्वी मारामारी, दंगल, आर्म ऍक्ट यासारखे गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.
ही कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, सोमनाथ कांबळे या विशेष पथकाने केली आहे