मुलभूत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
marathinews24.com
तळेगाव दाभाडे – येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने एकादशीनिमित्त मुलभूत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आळंदीत एकादशी निमित्त माऊलींचे पालखीची ग्राम प्रदक्षिणा – सविस्तर बातमी
या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या जसे की सामान्य तपासणी, नाडी, ऑक्सिजन प्रमाण, वजन, ॲनिमिया व उच्च रक्तदाब, ताप, खोकला, पोटदुखी यांसंबंधी आरोग्य विषयी सल्ले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सांधेदुखी, मधुमेह व फिजिओथेरपी विषयक तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिरामध्ये डॉ. साक्षी गुट्टे, डॉ. ओंकार गुट्टे, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. अजय कांडे आणि डॉ. रुत्विक यांनी नागरिकांना वैद्यकीय आरोग्य तपासणी करून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन केले.
यावेळी माजी राज्यमंत्री व विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त संजय (बाळा)भेगडे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल आणि सामाजिक कार्यकर्ते अजय भेगडे उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराचे आयोजन विश्वस्त ह.भ.प बाळकृष्ण आरडे महाराज, यतीनभाई शहा, विलास गायकवाड, शेखर गुंड, मुरलीधर ढेकणे, प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे, नारायण धामणकर, सोनबा गोपाळे गुरुजी, निशा शेळके यांनी केले होते. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



















