Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पत्नीला बेदम मारहाण करून केला खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

पतीसह तिघे अटकेत

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. ही घटनानुकतीच भवानी पेठेत घडली होती. वैष्णवी उर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (वय २३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (वय २८) मनोज रोहीदास कांबळे (वय ३९) वनिता मनोज कांबळे (वय ३२) यांना अटक झाली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता – सविस्तर बातमी 

पोलिसानी दिलेल्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक असून २८ जानेवारीला कौटुंबिक कारणावरुन त्याचा वैष्णवीशी वाद झाला होता. त्यामुळे त्यानेपत्नी वैष्णवीला बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती. घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना वैष्णवीचा मृत्यू झाला. याप्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×