Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून अंगठी चोरी – महिलेविरुद्ध गुन्हा

चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून एका महिलेने ३५ हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सराफ व्यावसायिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेला मुल होण्यासाठी अघोरी विद्या, भोंदू बाबाला बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाची वडगाव शेरीतील गणेशनगर भागात सराफी पेढी आहे. मंगळवारी (९ सप्टेंबर ) दुपारी एकच्या सुमारास सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने एक महिला शिरली. महिलेने सराफी व्यावसायिकाला अंगठी दाखविण्यास सांगितले. सराफ व्यावासयिकाला बोलण्यात गुंतवून महिलेने प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवलेली ३५ हजारांची सोन्याची अंगठी चोरली. महिलेने जाकीटमधील कप्यात अंगठी ठेवली. त्यानंतर ती सराफी पेढीतून पसार झाले. काही वेळानंतर सराफ व्यावसायिकाने अंगठी ठेवलेल्या ट्रेची पाहणी केली. तेव्हा अंगठी चोरल्याचे उघडकीस आले. सराफी पेढीतील चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा महिलेने सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून अंगठी चोरल्याचे दिसून आले. पोलीस हवालदार देशपांडे तपास करत आहेत.

वडगाव शेरी, लष्कर भागातील सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याचे दागिने चोरण्याच्या घटना दोन महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. या प्रकरणी महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

टिळक रस्त्यावर पीएमपी प्रवाशाकडील रोकड लंपास

पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून ४५ हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शेतकरी असून, परभणी जिल्ह्यातील धानोरा गावात राहायला आहे. तरुण कामानिमित्त पुण्यात आला होता. टिळक रस्ता परिसरात पीएमपी प्रवासी तरुणाच्या खिशातून ४५ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×