Breking News
राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात गुटखा तस्करांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्तपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहनरामटेकडीत आम्हीच भाई; शस्त्रधारी दोघांचा राडा

मित्राबरोबर अनैतिक संबंदधातून महिलेचा खून

मित्राबरोबर अनैतिक संबंदधातून महिलेचा खून

लोणीकंद पोलिसांकडून पती अटकेत

marathinews24.com

पुणे – मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याने महिलेवर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (वय १९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली. शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवडी, वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंदिरातील दानपेटीतून ४० हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख पठाण आणि नम्रता व्हटकर दोन महिन्यांपासून एकत्र राहण्यास होते. नम्रता आणि पठाण हे नगर रस्त्यावरील खासगी कंपनीत कामाला असताना दोघांची ओळख झाली होती . दोन वर्षांपूर्वी नम्रताचा शैलेंद्र व्हटकर याच्याशी विवाह झाला होता. नम्रता आणि पठाण यांच्यात अनेैतिक संबंध असल्याची कुणकुण शैलेंद्रला लागली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी नम्रता शैलेंद्रशी भांडण करून पठाण याच्याकडे राहण्यास आली होती. विवाहात दिलेले नम्रताचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडे होते. तिने त्याच्याकडे दागिने परत करण्याची मागणी केली होती. गुरुवारी (२२ जानेवारी पठाण कामानिमित्त शिरूर येथे गेला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतला, तेव्हा शैलेंद्रला दागिने परत करण्यास सांगितले आहे, असे तिने पठाणला सांगितले.

शैलेंद्रच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. नम्रता आणि पठाण यांना शैलेंद्रने नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावले. पठाणचा मित्र हरीश कोळपे तेथे आला होता. शैलेंद्रने नम्रताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तिला जोगेश्वरी हायस्कूलजवळ त्याने बोलाविले. नम्रता ही दुचाकी घेऊन तेथे गेली. दोघांमध्ये तेथे वाद झाल्यानंतर शैलेंद्रने नम्रतावर चाकूने वार केले. ओरडण्याचा आवाज पठाणने ऐकल्यानंतर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेरावर कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या शैलेंद्रला अटक केली. पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×