वाघोलीतील महिला गंजाविक्री प्रकरणी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार
Marathinews24.com
पुणे – गांजा विक्री करणार्या महिलेला एक वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तिच्याविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. छकुली राहुल सुकळे (वय २४ रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती वाघोली, ता. हवेली ) असे तडीपार केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी तिच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत.
लोणी काळभोरमध्ये अवैध जुगारधंद्यांना आळा बसण्याचे नाव नाही – सविस्तर बातमी
आरोपी छकुली सुकळे सराईत अमली पदार्थ तस्कर असून, तिच्याविरूद्ध वाघोली, लोणीकंद पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणे, पोलीसांच्या रखवालीतुन पळुन जाणे, उघडयावर चोरी करणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपी महिलेने वाघोलीसह परिसरात दहशत निर्माण केल्याने रहिवासी दडपणाखाली वावरत होते. लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व शारीरिक स्वास्थास धोका निर्माण झाला होता. तिच्यावर कायद्याचा वचक बसावा यासाठी एसीपी प्राजंली सोनवणे यांनी तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रजितवाड, उपनिरीक्षक वैजिनाथ केदार, सागर कडु, कमलेश शिंदे यांनी महिलेचे रेकॉर्ड तयार केले.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) प्रमाणे महिलेला तडीपार करण्यासंदर्भात उपायुक्त कार्यालयात प्रस्ताव प्राप्त झाला होता.त्यानुसार तिला पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. अवैध धंदे किंवा संघटीत स्वरुपात गुन्हे करुन दहशत निर्माण करणार्यावर कारवाईंची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, समीर बोरडे, मंगेश जाधव यांनी केली